4 मिनिटे VIDEO : 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 July 2021

4 मिनिटे VIDEO : 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 July 2021

| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 1:42 PM

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट करुन राष्ट्रवादीवर आसूड ओढला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही.