VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 March 2022
एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय धुरळा उडालेला आहे. महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपने तर या प्रस्तावावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय धुरळा उडालेला आहे. महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपने तर या प्रस्तावावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत.
