VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 June 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 June 2021

| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 2:29 PM

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुपारी चारनंतर इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात पूर्ण महाराष्ट्र कोरोना संपल्याचा भ्रमात होता. मात्र फेब्रुवारीत अमरावती आणि अचलपूरमध्ये रुग्णवाढ झाली, तेव्हा सरकारनं फक्त अमरावतीला लॉकडाऊन करुन इतर सर्व जिल्हे सुरु ठेवले. ज्याचा परिणाम मार्चमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यांदा महाराष्ट्रातूनच सुरु झाली.

 

Published on: Jun 28, 2021 02:28 PM