Malad Building | मुंबईतील मालाडमधील दुर्घटना, मोहम्मद रफिक यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

Malad Building | मुंबईतील मालाडमधील दुर्घटना, मोहम्मद रफिक यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 10, 2021 | 1:15 PM

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला.

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. यात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेने मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यातील दहा जण हे रफी यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. ज्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. मोहम्मद हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण ते दूध घेऊन परतल्यानंतर होत्याचं नव्हतं झालेलं पाहून त्यांच्या काळजात धस्स झालं.