एसी प्रोमुळे नवीन पर्वाची सुरुवात : गिरीश वाघ

Updated on: Jul 03, 2025 | 4:22 PM

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ सांगतात की, एसी प्रो ही ताकद, सुरक्षितता आणि स्वनिर्मित यशाचा नवा अध्याय आहे. हे केवळ एक वाहन नाही, तर महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. जे उद्योजकांना संघर्षातून प्रगतीकडे नेण्याचं बळ देतं आणि त्यांची स्वतःची यशोगाथा लिहायला प्रेरणा देतं.

मूळ टाटा एसीच्या पदार्पणाला दोन दशकं पूर्ण झाल्यानंतर, आता एक नवी शक्तिशाली सुरुवात करण्याची वेळ आली आहे. टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी एसी प्रोचे अनावरण करताना अभिमान व्यक्त केला आहे. हे वाहन ताकद, सुरक्षा आणि अधिक नफ्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे, असं गिरीश वाघ यांनी म्हटलं आहे.

केवळ एक व्यावसायिक वाहन नव्हे, तर ACE Pro म्हणजे आशा, महत्त्वाकांक्षा आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे. हे वाहन आजच्या उद्योजकांना उभारण्यासाठी आणि उद्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. “अब मेरी बारी” ही केवळ एक मोहीम नाही, ती एक वृत्ती आहे. स्वतःची वाट तयार करण्यास तयार असलेल्यांसाठी एक आवाहन आहे.

ACE Pro च्या माध्यमातून टाटा मोटर्स केवळ एक वाहन विकत नाही. ती संघर्षातून यशाकडे नेणारी यात्रा शक्य करत आहे, व्यक्तींच्या आणि देशाच्या प्रगतीस चालना देत आहे.

 

 

Published on: Jul 03, 2025 04:19 PM