आव्हाडांचे कट्टर समर्थक दादांच्या राष्ट्रवादीत गेले अन् अवघ्या 2 दिवसातच घरवापसी; म्हणाले, ‘मला ब्लॅकमेल…’
जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे अभिजीत पवार यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोन दिवसात अभिजीत पवार यांनी आपल्या आधीच्या पक्षातच परत येण्याचा निर्णय घेतला.
अभिजीत पवार यांनी अवघ्या दोन दिवसातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केल्याचे पाहायला मिळाले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे अभिजीत पवार यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोन दिवसात अभिजीत पवार यांनी आपल्या आधीच्या पक्षातच परत येण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी दबाव होता, असं अभिजीत पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिजीत पवार यांनी अजित दादा गटात प्रवेश केला होता. मात्र पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अभिजीत पवार यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. यासंदर्भात बोलताना अभिजीत पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात ब्लॅकमेलिंग सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड माझे नेते आहेत. मी कधीही त्यांची आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्यात माझ्यावर अनेक खोट्या केसेस टाकून त्रास देण्यात आला. राजकारणात असेही काही घडू शकतं हे मला शिकायला मिळाले. नजीब मुल्ला यांची सवय तुम्हाला माहीत आहे. माझ्या घरी माणसे पाठवली होती. माझ्या कार्यालयात एका व्यक्तीकडून शिव्या देण्यात आल्या. मला फसवण्यात आले. माझ्यावर मोकोका लावण्यात येणार होता. जितेंद्र आव्हाड यांना कसे अडकवता येणार त्यामुळे माझ्यावर ईडी केस लावण्यात येणार होती. नजीब मुल्ला मला सारखे फोन करत होते. त्यांनी मला ब्लॅकमेल केलं’, असं अभिजीत पवार यांनी सांगितले.
