Prajakta Mali Video : त्र्यंबकेश्वर विश्वस्तांकडून आयोजित प्राजक्ता माळीच्या ‘शिवस्तुती’ नृत्याविष्काराला विरोध, थेट पोलिसात पत्र
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात शिवस्तुती नृत्यविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता त्या कार्यक्रमाला मंदिर विश्वस्तांकडूनच विरोध होत असल्याचे दिसतेय.
येत्या महाशिवरात्रीला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यासंदर्भातील माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना थेट पत्र लिहिले आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात शिवस्तुती नृत्यविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता त्या कार्यक्रमाला मंदिर विश्वस्तांकडूनच विरोध होत असल्याचे दिसतेय. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना लिहिलेल्या पत्रात यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची मंदिरात परंपरा नाही, असे म्हणत वादग्रस्त असल्याने प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध होतोय. तर महाशिवरात्रीला सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये, असं विश्वस्त ललिता शिंदे यांनी म्हटलंयय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मोठी रिघ पाहायला मिळते. याच दिवशी मंदिर विश्र्वस्तांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, यंदाच्या महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता माळीच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले होते.
