सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप; आदित्य ठाकरेंची टीका

सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप; आदित्य ठाकरेंची टीका

| Updated on: Jun 29, 2025 | 2:28 PM

धिवेशनापूर्वी घेण्यात येणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत टीका केली आहे.

सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप तर आहेच. पण ज्या पद्धतीने महायुती ज्या पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. 3 दिशेला 3 तोंडं आहेत. अनेक विषयावरुन भांडण सुरू आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे. उद्या पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी घेण्यात येणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर मविआची पत्रकारपरिषद झाली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील तिघांची तोंडं तीन वेगवेगळ्या देशांना आहेत. राज्यकारभाराचा समन्वयच हरवला असून जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत. पालकमंत्री-मालकमंत्री पदावरुन वाद सुरू आहे. भ्रष्टाचारी लोकं आज भाजपसोबत असून त्यांची टॅगलाईन ही दाग अच्छे आहे अशी झाली आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना आठवेल की मी यांच्यावर आरोप केले होते. 11 वी प्रवेशाच्या यादी तयार करण्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी पैसे खाल्ले आहेत का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यांनी मुलांवर हिंदी सक्ती लादली आहे. समृद्धी महामार्गावर नदी वाहते, खड्डे पडले आहेत, त्यांना हे लक्षात यायला हवे की त्या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले आहे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे.

Published on: Jun 29, 2025 02:28 PM