Dharashiv Protest News : ‘तो आमचा विठ्ठल..’ धाराशीवमध्ये खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला

Dharashiv Protest News : ‘तो आमचा विठ्ठल..’ धाराशीवमध्ये खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला

| Updated on: Mar 23, 2025 | 4:52 PM

सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला शिरूर कासारच्या मारहाण प्रकरणातला आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या समर्थनार्थ आज आदिवासी समाज आक्रमक झालेला बघायला मिळाला.

धाराशीव येथे आज शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झालेला बघायला मिळाला आहे. यावेळी त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन देखील आदिवासी समाजाने केलं. केवळ संधीसाधू लोकांनी आमदार सुरेश धस यांच्यावरचं उट्ट काढण्यासाठी भोसले कुटुंबाचा वापर केला आहे. त्यातच वन विभागाने घाई घाईने कारवाई केली. व्हिडिओ व्हायरल केले. पण सतीश भोसलेला दाखवलं तेवढा तो मोठा वॉन्टेड नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केली आहे. सतीश भोसले याची पत्नी गेल्या 5 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेली आहे. तिच्यासोबत तिचं 3 महिन्यांचं बाळ देखील आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडून या उपोषणाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, धाराशिवात सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असे म्हणत त्याच्या मित्रांनी हातावर विठ्ठल नावाचं टॅटू काढलेलं आहे. सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार केली जात असल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.

Published on: Mar 23, 2025 04:51 PM