Supriya Sule | दादा मला खरंच काही माहीत नाही… अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
बारामतीवरून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारला. मात्र, या मुद्द्यांवर बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे टाळाटाळ केली. “ दादा मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे सांगत त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या आईचे सांत्वन केले. या भावनिक भेटीनंतर सुप्रिया सुळे या उद्या सादर होणाऱ्या देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, बारामतीवरून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारला. मात्र, या मुद्द्यांवर बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे टाळाटाळ केली. “ दादा मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे सांगत त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
Published on: Jan 31, 2026 05:29 PM
