Baramati | अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तींचे विसर्जन आज करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार काही काळ खचलेले दिसत होते, मात्र आता ते बारामतीत सक्रिय झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तींचे विसर्जन आज करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार काही काळ खचलेले दिसत होते, मात्र आता ते बारामतीत सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी बारामतीतील प्रदूषित नीरा नदीची पाहणी केली. नीरा नदीच्या पाण्याची स्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. नदीतील प्रदूषणाबाबत चर्चा करत त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. अजित पवारांच्या अस्ती विसर्जनानंतर शरद पवार पुन्हा सार्वजनिक कामात सक्रिय झाल्याचं या पाहणीवरून दिसून येत आहे.
Published on: Jan 30, 2026 06:08 PM
