tv9 Marathi Special Report | ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने…

tv9 Marathi Special Report | ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने…

| Updated on: Jan 23, 2026 | 11:00 AM

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवलं होतं. त्यानंतर कोकण भवनात देखील बैठक झाली. या दोन्ही बैठकांना सरिता म्हस्के गैरहजर होत्या. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं होतं. काही काळ संपर्क होत नसल्याने त्या दुसऱ्या पक्षात जाणार का? अशी चर्चा रंगली होती.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगरसेवक फुटीची भीती सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना होती, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर त्यांचे जिंकून आलेले नगरसेवक मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के ह्या नॉटरिचेबल होत्या. मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवलं होतं. त्यानंतर कोकण भवनात देखील बैठक झाली. या दोन्ही बैठकांना सरिता म्हस्के गैरहजर होत्या. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं होतं. काही काळ संपर्क होत नसल्याने त्या दुसऱ्या पक्षात जाणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र दोन दिवसांनी सरिता म्हस्के यांनी स्वतः पुढे येत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आपला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम असून शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवदर्शनाला बाहेर असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही, असं सरिता म्हस्के यांनी सांगितलं.

Published on: Jan 23, 2026 11:00 AM