Maharashtra Flood :  सरकार ऐका हा शेतकऱ्यांचा आक्रोश… मदत नको पण थट्टा थांबावा, बळीराजाचा का होतोय संताप?

Maharashtra Flood : सरकार ऐका हा शेतकऱ्यांचा आक्रोश… मदत नको पण थट्टा थांबावा, बळीराजाचा का होतोय संताप?

| Updated on: Sep 29, 2025 | 11:17 AM

आपल्या भाषणात कायम गावगाड्यांचा कैवार घेणारे सदाभाऊ अख्खा गावगाडा उद्ध्वस्त झाल्यानंतर उगवले. एरवी सदाभाऊ वारंवार शेण मातीतला माणूस म्हणून घेतात. मात्र तेच शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला पोहोचले नाहीत.

180 रुपयात गुंठाभर शेतीची दुरुस्ती होते का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय. मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र
आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शेकडो हेक्टरवरची ही शेती भुईसपाट झाली आहे. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय. मात्र अद्यापही सरकारकडून त्याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. या आक्रोशानंतर तरी सरकार पंचनामे आणि औपचारिक पाहण्यांचा आग्रह सोडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठे निर्णय घेईल, अशी आशा आहे. कारण मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अन् उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय. यामुळे शेतकऱ्याला काय करू आणि काय नको… असं झालं असून एकच संताप पाहायला मिळतोय.

Published on: Sep 29, 2025 11:17 AM