Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
Ahmedabad Plane Crash Updates : अहमदाबाद विमान अपघातात क्रू मेंबर अपर्णा महाडीक यांचं देखील निधन आलं आहे. त्य गोरेगावमधील रहिवाशी होत्या.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 ने अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 क्रू मेंबर्संनाही आपला जीव गमवावा लागला. त्यात महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते.
दरम्यान, यातल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या, अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. सुनील तटकरे गोरेगावमध्ये अमोल महाडिक यांच्या घरी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी महाडीक कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या घटनेने गोरेगावमध्ये शोककळा पसरली आहे.
Published on: Jun 13, 2025 04:41 PM
