मतदानावेळी दोन गट समोर समोर भिडले; भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने

| Updated on: Apr 28, 2023 | 10:07 AM

Agricultural Produce Market Committee Election 2023 : मतदानावेळी दोन गट समोर समोर भिडले; भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने. पाहा व्हीडिओ..

Follow us on

अहमदनगर : अहमदनगर बाजार समितीच्या मतदानावेळी दोन गट समोर समोर भिडले. भाजपची मतदारांना घेऊन येणारी बस थेट मतदान केंद्रावर आणल्याने राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या दोन गटात एकमेकांच्या समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले समर्थक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाली. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील 14 पैकी 7 बाजार समितीसाठी आज मतदान होतंय. भाजपच्या सर्व बाजार समिती येतील. अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, राहूरी,कर्जत, पाथर्डी आणि संगमनेर बाजार समितीसाठी आज निवडणूक होत आहे. कर्जतमध्ये भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर नगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले आमदार प्राजक्ता तनपुरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.