Chiplun Rescue Operation | चिपळूणमध्ये वायू दलाचे रेस्क्यू ऑपरेशन, 2 जणांना वाचवण्यात यश

| Updated on: Jul 23, 2021 | 5:23 PM

चिपळूणमध्ये भारतीय वायू दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. यावेळी 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. चिपळूणच्या आसपासच्या परिसरात हे दोघे जण अडकलेले होते.

Follow us on

चिपळूणमध्ये भारतीय वायू दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. यावेळी 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. चिपळूणच्या आसपासच्या परिसरात हे दोघे जण अडकलेले होते. या ठिकाणाहून भारतीय वायू दलाने दोघांना रेस्क्यू केलं आहे.  महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. मुंबई वेधशाळेनं आज दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे 2, 3 दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.