Air India AI Dreamliner : एअर इंडियाचं चाललंय काय? एका दिवसात 7 तर 6 दिवसात 66 फ्लाईट्स रद्द; सुप्रिया सुळे भडकल्या, खूपच वाईट…

Air India AI Dreamliner : एअर इंडियाचं चाललंय काय? एका दिवसात 7 तर 6 दिवसात 66 फ्लाईट्स रद्द; सुप्रिया सुळे भडकल्या, खूपच वाईट…

| Updated on: Jun 18, 2025 | 10:05 AM

एअर इंडियाने लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बंगळुरू-लंडन, मुंबई-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-दुबई आणि दिल्ली-व्हिएन्ना अशा फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. या सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स होत्या.

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. एअर इंडियाच्या फ्लाईट्स सतत रद्द केली जात आहेत. एअर इंडियाचे १२ जून ते १७ जून दरम्यान तब्बल ६६ विमानं रद्द करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. नागरी विमान नियामक संघटना DGCA ने यासंदर्भात माहिती दिली. यानंतर काल १७ जून रोजी एका दिवसात एअर इंडियाच्या ७ फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

काल एकाच दिवसात एअर इंडियाच्या ७ फ्लाईट्स रद्द

AI915 – दिल्ली ते दुबई – B788 ड्रीमलायनर
AI153 – दिल्ली ते व्हिएन्ना – B788 ड्रीमलायनर
AI143 – दिल्ली ते पॅरिस – B788 ड्रीमलायनर
AI159 – अहमदाबाद ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI170 – लंडन ते अमृतसर – B788 ड्रीमलायनर
AI133 – बेंगळुरू ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI179 – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को – B777

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

दरम्यान, काल एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने सुप्रिया सुळे देखील संतापल्या. त्यांनी एअर इंडियाला टॅग करत खूप वाईट सेवा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

Published on: Jun 18, 2025 10:05 AM