Ajit Pawar : हे मला जास्त महागात पडतंय; कोकाटेंच्या विधानावर अजितदादांची प्रतिक्रिया

Ajit Pawar : हे मला जास्त महागात पडतंय; कोकाटेंच्या विधानावर अजितदादांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 01, 2025 | 4:17 PM

Ajit Pawar On Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली असून कोकाटे यांना सल्ला देखील दिलेला आहे.

काही गोष्टी या मनात ठेवायच्या असतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला आहे. कोकाटे यांना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत. आता मला जास्त महागात पडतंय असंही यावेळी अजितदादांनी म्हंटलं आहे.

नाशिकच्या नुकसानग्रस्त भागातील पाहणी दरम्यान ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त विधान मंत्री कोकाटे यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. याच संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. आता मला हे जास्त महागात पडत आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हंटलं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. कोकाटे यांना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, काही गोष्टी या मनात ठेवायच्या असतात, असंही यावेळी अजित पवार यांनी बोलताना म्हंटलं आहे.

Published on: Jun 01, 2025 04:11 PM