Ajit Pawar Death Update | नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे

Ajit Pawar Death Update | नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे

| Updated on: Jan 29, 2026 | 1:46 PM

अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे जनतेत आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजकारणातील अजित पवार नावाचं नेतृत्व कायमचं विलीन झालं आहे. महाराष्ट्राला कायमची आस लावून एक कुशल नेता अकाली निघून गेला आणि अखेर एक अजित पर्व शांत झालं आहे. अजित दादांच्या या अकाली जाण्याने कार्यकर्ते भावूक झाले असून आपलं दुःख व्यक्त करत आहेत.

अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे जनतेत आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजकारणातील अजित पवार नावाचं नेतृत्व कायमचं विलीन झालं आहे. महाराष्ट्राला कायमची आस लावून एक कुशल नेता अकाली निघून गेला आणि अखेर एक अजित पर्व शांत झालं आहे. अजित दादांच्या या अकाली जाण्याने कार्यकर्ते भावूक झाले असून आपलं दुःख व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही दादांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आजपर्यंत बारामतीत जेवढे कार्यक्रम झालेत त्याचं सगळं नियोजन अजितदादा करत होते. दादा सगळं जातीने पाहत होते, आणि आज त्यांच्या अंतिम संस्काराचं नियोजन हे पोलीस आणि प्रशासनाने व्यवस्तित केलं. पण या पुढच्या काळात अजितदादा सारखा नियोजन करणारा नेता पुन्हा होऊ शकत नाही, असं म्हणत काकडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Published on: Jan 29, 2026 01:46 PM