Ajit Pawar कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका? पाहा

Ajit Pawar कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका? पाहा

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 6:45 PM

आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. पक्षपात करू नका, कुणाबद्दलही आकस बाळगू नका, सर्वांची कामं समतोलने करा. हलक्या कानाचे अजिबात होऊ नका, असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा कान टोचले आहेत.

औरंगाबादेतील गंगापूरमधील नगरसेवकांचं आज राष्ट्रवादीत इनकमिंग झाल्याचे दिसून आले. काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी बळकटी मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला खिंडार पाडत मालेगावातही राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग झाल्याचे पाहयला मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचना करताना अजित पवारांना आर. आर, पाटलांची पुन्हा आठवण आली, आबांबद्दल बोलताना ते म्हणाले. आम्ही या पक्षातम काल आलेला आणि जुना असा भेदभाव करत नसतो. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांना पदं मिळाली. आर, आर, पाटील असेच एक नाव आहे त्यांनी अनेक पद भूषवली, असे म्हणत पुन्हा आबांची आठवण काढली. तसेच आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. पक्षपात करू नका, कुणाबद्दलही आकस बाळगू नका, सर्वांची कामं समतोलने करा. हलक्या कानाचे अजिबात होऊ नका, असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा कान टोचले आहेत.