Pune Civic Polls : कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट, निवडणुका जिंकण्यासाठी गुंडाचा सहारा?

| Updated on: Dec 31, 2025 | 10:52 AM

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग 10 मधून त्या घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. या निर्णयामुळे अजित पवारांवर चौफेर टीका होत असून, निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांच्या कुटुंबांना तिकीट दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 10 मधून जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या निर्णयामुळे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधकांनी अजित पवार यांच्यावर निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. गजा मारणे हा मकोका अंतर्गत आरोपी असून त्याच्यावर हत्या, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे असे 27 ते 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने अजित पवारांच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का लागल्याची चर्चा आहे. जानेवारी 2024 मध्ये पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतल्याने झालेल्या राजकीय गदारोळानंतर अजित पवारांनी ही भेट चुकीची असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

Published on: Dec 31, 2025 10:49 AM