Ajit Pawar : अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा

Ajit Pawar : अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा

| Updated on: Apr 13, 2025 | 10:53 AM

Suraj Chavan Home Ajit Pawar : बिग बॉस फेम सूरज चव्हाण याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अजित पवार यांनी आज सूरजच्या घरच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण याच्या घराच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून आढावा घेतला. सुरज चव्हाण हा अजित पवार यांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये सुरजने नाव कमवल्याचं कळताच अजित पवार यांनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी सूरजला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर सूरजच्या घराचं बांधकाम देखील सुरू झालं. त्याच पार्श्वभूमीवर आज मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटलं की, प्रत्येकाच्या अंगात काहीतरी गुण असतात. त्या गुणांना वाव मिळाला की माणूस कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो. याच उदाहरण सूरज चव्हाण आहे. त्याचा चित्रपट येतो आहे. त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. पण तो मेहनत करतोय. मी आज या भागात दौऱ्यावर होतो. परवा सूरज मला येऊन भेटला तेव्हा म्हणाला होता, की घराच काम सुरू झालं आहे. त्यामुळे मी आज पाहणी केली.

Published on: Apr 13, 2025 10:50 AM