Ajit Pawar : अजित पवार कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल

Ajit Pawar : अजित पवार कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल

| Updated on: May 23, 2025 | 7:51 PM

Vaishnavi Hagawane Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वैष्णवीच्या माहेरी जाऊन कसपटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे.

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ माजलेली आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे वैष्णवीच्या माहेरी कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत.

वैष्णवीचा प्रेमविवाह हा शशांक हगवणेशी झाला होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. लग्नानंतर वैष्णवीचा हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाकडून अमानुष छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. यानंतर हगवणे यांचे काळे कारनामे उघड झाले. वैष्णवीच्या कुटुंबाने लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीचे भांडे आणि फॉरच्युनर कार दिलेली होती. तरीही आणखी हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता. वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर काही गंभीर आरोप देखील यावेळी केलेले आहेत. विशेष म्हणजे वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात स्वत: अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी फॉरच्युनर कार बद्दल देखील हगवणे यांना प्रश्न विचारला होता. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अजितदादांनी हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यानंतर आज अजित पवार हे कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहे.

Published on: May 23, 2025 07:51 PM