Malegaon Sakhar karkhana Election Result : माळेगावच्या निवडणुकीत ब वर्ग गटातून दादांचा विजय
Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत वर्ग ब गटातून अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचा विजय झाला आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत वर्ग ब गटातून अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचा विजय झाला आहे. अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून ही निवडणूक बघितली जात आहे. यात आता ब वर्ग गटातून अजित पवारांच्या पॅनलचा विजय झाला आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल आता हाती आला आहे. यात ब वर्ग गटातून अजित पवार सध्या आघाडीवर होते. त्यानंतर आता त्यांचा या वर्गातून विजय झाला आहे. माळेगाव साखर कारखान्याची सत्ता काबिज करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांच आणि शेतकरी संघटनांच अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत.
माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. यासाठी अजित पवार स्वत: गेल्या काही दिवसांपासून बारामतीत तळ ठोकून होते. मतदानाच्या दिवशी देखील अजित पवार यांनी सर्व गावातील बूथची पाहणी करून आढावा घेतला होता. अजित पवार यांना 85 वर्षांच्या चंद्राराव तावरे यांनी आव्हान दिलं आहे. तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
