VIDEO | शरद पवार v/s अजित पवार? आज मिळणार करारा जवाब; अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा

VIDEO | शरद पवार v/s अजित पवार? आज मिळणार करारा जवाब; अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा

| Updated on: Aug 26, 2023 | 2:44 PM

अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून बंडखोर नेत्यांचा त्यांच्या मतदार संघात जाऊन समाचार घेतला जात आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून देखील याच्याविरोधात राण उठवले जात आहे. तर आज अजित पवार यांची बीड येथे जाहीर सभा होणार आहे.

बीड : 26 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडल्यानंतर शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याकडून बंडखोर आमदारांचा योग्य समाचार घेतला जात आहे. शरद पवार यांनी नाशिक, बीड, सातारा आणि कोल्हापूर येथे निर्धार सभा घेऊन अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांची चिरफाड केली आहे. तर त्यांच्याकडून टीका होत आहे. यावरून आता अजित पवार गट देखील जशास तसे उत्तर देण्यात तयार आहे. आता अजित पवार यांची बीड येथे प्रत्युत्तर सभा आज होणार आहे. त्याची जय्यत तयारी झाली असून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून शरहात फलकबाजी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या फलकांवर शरद पवार यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. अजित पवार यांचे स्वागत करण्यासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती राहणार आहे. तर अजित पवार याच्या सभेच्या पार्श्वभमीवर बीड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात तीन पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, 43 पोलीस उपनरीक्षक यांच्यासह कर्मचारी असे तब्बल 445 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Published on: Aug 26, 2023 02:35 PM