Mumbai | पहिल्यांदाच असं घडलं… 8 वाजून गेले तरी मंत्रालय सुनं सुनं… अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली

| Updated on: Jan 30, 2026 | 12:26 PM

अजित पवार यांच्या आठवणींनी मंत्रालयातील वातावरणही सुन्न झालं आहे. अजितदादा मंत्रालयात आले की संपूर्ण मंत्रालयात वेगळीच लगबग पाहायला मिळायची. सकाळी 8 वाजताच मंत्रालय गजबजलेलं असायचं. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गर्दी दिसून यायची. मात्र, आज तीच गजबज कुठेतरी हरवलेली दिसत आहे. मंत्रालयात एक प्रकारची शांतता निर्माण झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबालाच नव्हे, तर राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर हजारो कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ होते. त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक अजूनही ‘दादा गेले’ हे सत्य स्वीकारू शकत नाहीत. अजित पवार यांच्या आठवणींनी मंत्रालयातील वातावरणही सुन्न झालं आहे. अजितदादा मंत्रालयात आले की संपूर्ण मंत्रालयात वेगळीच लगबग पाहायला मिळायची. सकाळी 8 वाजताच मंत्रालय गजबजलेलं असायचं. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गर्दी दिसून यायची. मात्र, आज तीच गजबज कुठेतरी हरवलेली दिसत आहे. मंत्रालयात एक प्रकारची शांतता निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेलं अजित पवार यांचं दालन नेहमी गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. विविध प्रश्न घेऊन आलेले नागरिक, कार्यकर्ते, आमदार आणि अधिकारी यांची सतत वर्दळ असलेलं हे दालन आज मात्र ओसाड पडलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हानी झाली आहे.

Published on: Jan 30, 2026 12:26 PM