Netflix वरील लादेनच्या सीरिजची चर्चा; अमेरिकेनं कसा घेतला 9/11 हल्ल्याचा बदला?

Netflix वरील लादेनच्या सीरिजची चर्चा; अमेरिकेनं कसा घेतला 9/11 हल्ल्याचा बदला?

| Updated on: Jul 04, 2025 | 9:38 AM

जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेनला कसं ठार मारण्यात आलं, याबद्दलची डॉक्युमेंट्री सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली आहे. या सीरिजचे एकूण तीन एपिसोड्स आहेत.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अमेरिकन मॅनहंट – ओसामा बिन लादेन’ (American Manhunt: Osama bin Laden) ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. 9/11 हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याला अमेरिकन सरकारने कसं पकडलं, अबोटाबादमधील मिशन कशा पद्धतीन पार पाडण्यात आलं, त्याबद्दल पाकिस्तानी सरकारला कानोकान खबर का लागू दिली नव्हती, या सर्व प्रश्नांची उत्तरं या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये मिळतात. या सीरिजचे एकूण तीन एपिसोड्स आहेत. 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद इथं अमेरिकन सैन्याने कशा पद्धतीने लादेनला ठार केलं, याची दशकभराची कथा यात पहायला मिळते. त्यात सीआयएचे (CIA) अधिकारी, अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा यांच्या प्रशासनातील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे.

Published on: Jul 03, 2025 10:21 AM