Loksabha :  ‘ते’ विधेयक मांडलं अन् विरोधकांचा गदारोळ, विधेयकाची कॉपी फाडून थेट शाहांकडे भिरकावली

Loksabha : ‘ते’ विधेयक मांडलं अन् विरोधकांचा गदारोळ, विधेयकाची कॉपी फाडून थेट शाहांकडे भिरकावली

| Updated on: Aug 20, 2025 | 6:27 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच लोकसभेत १३० वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. देशभरात या विधेयकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बघा लोकसभेत नेमकं काय घडलं?

गृहमंत्री अमित शहा यांनी आज बुधवारी लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके सादर केली. ही तीन विधेयके सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘संविधान मोडू नका’ अशा घोषणा दिल्या. इतकंच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत १३० वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक सादर करत असताना, विरोधकांनी सभागृहात मोठा गदारोळ घातला. या विधेयकाला विरोध करत असताना, विरोधकांनी थेट विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने भिरकावल्या. या घटनेमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. विरोधकांचा या गोंधळातही अमित शाह यांनी आपलं विधेयक सादर करणं न थांबवता सुरूच ठेवलं. अशातच विरोधकांचा आक्रमकपणा वाढला आणि घोषणाबाजी करत विरोधकांनी अमित शाह यांच्या चेहऱ्याच्या दिशेने विधेयकाच्या कॉपीला फाडत त्याचे तुकडे भिरकावले. हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

Published on: Aug 20, 2025 04:25 PM