Amit Thackeray : शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो.., ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Amit Thackeray : शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो.., ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jun 05, 2025 | 12:39 PM

Thackeray Brother Unity : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्याक चर्चांवर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. काहीकाळ या चर्चा थंडावल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही युतीबद्दल सकारात्मक आहोत असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काल आदित्य ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता आज अमित ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे.

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अमित ठाकरे म्हणाले की, मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही आहे. आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे फ़ोन आहे त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही 2014-17 मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यावं. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे, असं अमित ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jun 05, 2025 12:39 PM