Video : अमित ठाकरेंच्या लेकाचं बारसं, किआन नावाचा अर्थ काय?

| Updated on: May 06, 2022 | 5:56 PM

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने […]

Follow us on

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही यावरून बरेच पोस्ट व्हायरल झाले होते. अखेर नातवाचं नाव समोर आलं आहे. किआन या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God) असं असून हे भगवान विष्णूचं दुसरं नाव मानलं जातं. या नावाचा आणखी एक अर्थ प्राचीन किंवा राजेशाही असाही होतो.