हनुमान चालिसा पठणावरून नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा सल्ला; काय म्हणाल्या? पाहा…

हनुमान चालिसा पठणावरून नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा सल्ला; काय म्हणाल्या? पाहा…

| Edited By: | Updated on: Feb 23, 2023 | 8:10 AM

खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठणावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत? पाहा...

अमरावती : हनुमान चालिसा पठणावरून खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. “हनुमानाने लंका अशी जाळली की राखही त्यांच्या हाती लागली नाही.आता हीच आठवण उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे आणि घरी बसून हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. मी फक्त ऐकलं होतं की घमंड माणसाला संपवून टाकते.पण आता उद्धव ठाकरेंना रूपात ते प्रत्यक्षात पाहत आहे. 56 वर्ष रक्ताचं पाणी करून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. पण त्याची माती करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 23, 2023 07:43 AM