Bachchu Kadu : शेतकरी प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक

Bachchu Kadu : शेतकरी प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक

| Updated on: May 19, 2025 | 7:32 PM

Amravati Prahar Protest : प्रहार संघटनेकडून आज बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत शिक्षकांनी आंदोलन केलं आहे.

राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे, असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी आज बच्चू कडू यांनी आंदोलन केले. शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या आदेशाची होळी केली. त्यामुळे आता शेतकरी प्रश्नानंतर बच्चू कडू हे शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत देखील आक्रमक झालेले बघायला मिळालेले आहेत. जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करावा, अशी मागणी देखील यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे.  सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जीआर तत्काळ रद्द करावा. सरकारने काढलेला हा जीआर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 ला छेद देणारा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

Published on: May 19, 2025 07:32 PM