महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत थोड्याच वेळात सुनावणी; ‘या’ मुद्द्यावरून ठाकरेगट आक्रमक होणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत थोड्याच वेळात सुनावणी; ‘या’ मुद्द्यावरून ठाकरेगट आक्रमक होणार

| Edited By: | Updated on: Feb 21, 2023 | 10:36 AM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. या सुनावणीआधी ठाकरेगटाचे अनिल देसाई यांनी महत्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय. पाहा...

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. या सुनावणीआधी ठाकरेगटाचे अनिल देसाई यांनी महत्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय. “आजपासून सलग सुनावणी होणार आहे. आमचा आग्रह हाच आहे की 21 जून पासूनच्या घटनाक्रम पाहा, यातून कायद्यात्मकरित्या कारवाई कशी होते पाहावं. संविधानाच्या तरतूदी धरून या कारवाई पाहाव्यात. पक्षविरोधी त्यांनी काम केलंय का हे पहावं. प्राथमिक सदस्यत्व सोडलंय का? व्हीप कसा काढला? अधिवेशन बोलवणे राज्यपालांच्या अधिकारात होते का? मोठा पेच निर्माण झालंय”, असं अनिल देसाई म्हणालेत. निवडणूक आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी दरम्यान हा मुद्दा येऊ नये. याचा वेगळा परिणाम होऊ शकतो, असंही ते म्हणालेत.

Published on: Feb 21, 2023 10:36 AM