Anjali Damania: पुणे जमीन घोटाळा प्रकरण थेट दिल्लीत? अजित दादांचं नाव घेत… मोठी अपडेट समोर
अंजली दमानिया यांनी 40 एकर सरकारी जमीन, अंदाजे 1800 कोटी रुपयांची, अमेडिया कंपनीने केवळ 500 रुपयांत हडपल्याचा आरोप केला आहे. डेटा सेंटरच्या नावाखाली स्टॅम्प ड्युटी सवलत मिळवून हा मोठा घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची 24 तासांत मागणी केली असून, राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या सरकारी जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. अंदाजे 1800 कोटी रुपये किमतीची 40 एकर सरकारी जमीन अमेडिया कंपनीने केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून हडपल्याचा आरोप दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. अमेडिया कंपनीने डेटा सेंटर सुरू करण्याच्या नावाखाली लेटर ऑफ इंटेंट (LOI) वापरून मुद्रांक शुल्कात सवलत मिळवली, मात्र हा व्यवहार जमिनीच्या खरेदी-विक्रीचा होता असे दमानियांचे म्हणणे आहे.
अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अनेक स्तरांवर फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, सरकारी जमिनीचे संरक्षक असलेले जिल्हाधिकारी, जूनपासून माहिती असूनही कारवाई करण्यात अपयशी ठरले. त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांना याची माहिती होती का, असा सवाल उपस्थित केला. दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या 24 तासांत राजीनाम्याची मागणी केली असून, राजीनामा न दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची चेतावणी दिली आहे.
