Anjali Damania : पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
Anjali Damania On Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मद्यविक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसंच दमानिया यांनी एक मागणी देखील केली आहे. अजित पवार हे अनेक कारखान्यांच्या संचालकपदी आहेत. मद्य बनवणाऱ्या केपविटेज कंपनीत जय पवार संचालक आहेत. त्यामुळे अजित पवार हे अंबानी-आदानी यांच्यापेक्षा कमी नाही, असं टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे.
यासंदर्भात व्हिडीओ पोस्ट करत अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे की, मद्यविक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असूनसुद्धा हे पद देण्यात येऊ नये, अशा स्पष्ट मताची मी आहे. अनेक साखर कारखान्यात देखील ते संचालकपदी आहेत. केपविटेज नावाच्या कंपनीत अजित पवारांचा मुलगा जय पवार देखील संचालक आहे. राज ग्रुप कंपनीचा देखील मी याआधी खुलासा केला होता. असं असताना हे काही देश सेवा करायला आलेले नाहीत. हे सगळे बिजनेसमन आहेत. त्यामुळे त्यांना हे पद दिलं गेलं पाहिजे.
