Anjali Damania Video : ‘…याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे का?’, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांचा पुन्हा सरकारवर निशाणा

Anjali Damania Video : ‘…याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे का?’, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांचा पुन्हा सरकारवर निशाणा

| Updated on: Feb 25, 2025 | 5:50 PM

बीड हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. कृपा करून मस्साजोग ग्रामस्थांना न्याय द्या, असं म्हणत अंजली दमानिया यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन तीन महिने उलटून गेले तरी अद्याप आरोप पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याचे दिसतेय. दरम्यान, बीड हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. कृपा करून मस्साजोग ग्रामस्थांना न्याय द्या, असं म्हणत अंजली दमानिया यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. दरम्यान, आजपासून मस्साजोग येथील ग्रामस्थांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून प्रमुख सात मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन पाहून दुःख होत असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले असून त्यात सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री संत्री असाल तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागत. आज तागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही, तीन महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही, वकिलांची नियुक्ती होत नाही, असं म्हटलंय. तर तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? बालाजी तांदळेला घेऊन पोलीस फिरत होते, हे गृहमंत्र्यांना माहीत आहे का? असे काही सवालही दमानिया यांनी यावेळी केलेत.

Published on: Feb 25, 2025 05:50 PM