Anjali Damania : ‘घुलेचा जबाब अपूर्ण? सगळं लपवण्याचा प्रयत्न…’, आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती

Anjali Damania : ‘घुलेचा जबाब अपूर्ण? सगळं लपवण्याचा प्रयत्न…’, आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती

| Updated on: Mar 29, 2025 | 12:07 PM

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी पोलिसांना आपला कबुली जबाब दिला. यामध्ये हत्येची कबुली देताना आरोपी सुदर्शन घुलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबातील थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे.

सगळं लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित करत सुदर्शन घुलेचा दबाब अपूर्ण असल्याचं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया यांनी एक ट्वीट करत हा निशाणा साधला आहे. ‘सुदर्शन घुले यांचा जबाब अपूर्ण ? सगळे लपवण्याचा प्रयत्न ? एक स्टँडर्ड फॉर्मेट सारखा तिघांचा जबाब आहे.’, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी ट्वीटमध्ये असंही म्हटलंय की, देशमुखांच्या हत्येनंतर त्यांनी पळून जायचं कस ठरवलं?, कोणी मदत केली?, कुठे गेले?, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्या बरोबर होता?, कुणाच्या सांगण्यावरून ते पाळले?, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे कुठे पळाले?, भिवंडीला किती दिवस होते?, कोणी पैसे पोहोचवले?, मग ते पुण्यात कसे आले?, कोणी यायला सांगितलं? कृष्णाला त्यांनी काय केलं? असे एक ना अनेक सवाल अंजली दमानिया यांनी केलेत. तर सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसं व कधी झाला ? डॉ वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले ? हे काहीच जबाबातून समोर आले नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 29, 2025 12:07 PM