Pakistan Al-Qaeda : हम अल्लाह के, कसम खाते है की… ऑपरेशन सिंदूरनंतर अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी; पत्र व्हायरल

Pakistan Al-Qaeda : हम अल्लाह के, कसम खाते है की… ऑपरेशन सिंदूरनंतर अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी; पत्र व्हायरल

| Updated on: May 08, 2025 | 11:04 AM

ऑपरेशन सिंदूर नंतर, अल-कायदाने भारताला जिहादची धमकी दिली आहे. प्रत्येक अत्याचाराचा बदला घेईपर्यंत आम्ही लढू असे AQIS ने म्हटले आहे. या विधानामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

भारताने ६ मे २०२५ च्या रात्री ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानी भूमीवर क्षेपणास्त्रे डागली. याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी संघटना अल-कायदाची भारतीय उपखंडातील शाखा असलेल्या AQIS ने भारताला उघडपणे पोकळ धमकी दिली आहे.  AQIS ने भारतावर इस्लामविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप केला आणि म्हटले की प्रत्येक अत्याचाराचा बदला घेईपर्यंत आम्ही लढू, आम्ही अल्लाहचे आहोत आणि अल्लाहची शपथ घेतो. या धमकीनंतर गुप्तचर संस्थांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून, अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेने अत्यंत आक्रमक भाषेत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील सहा ठिकाणी हल्ला केला आणि मशिदी आणि पाक वस्त्यांना लक्ष्य केले आणि पाकिस्तान त्याचा बदला घेणार.

Published on: May 08, 2025 10:58 AM