Arjun Khotkar : भाजप सोबत येत सेल तर…. जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान

| Updated on: Dec 24, 2025 | 12:55 PM

भाजपकडून जालन्यातील युतीच्या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्यास इतर पक्षांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट विधान अर्जुन खोतकर यांनी केले आहे. BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मोठे संकेत दिले आहेत. शहराच्या विकासासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे खोतकरांनी नमूद केले.

भाजपने प्रतिसाद न दिल्यास इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट विधान अर्जुन खोतकर यांनी केले आहे. जालन्यामध्ये शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी जालना महापालिकेच्या युतीवरून हे मोठे विधान केले. खोतकर यांनी म्हटले आहे की, जर भाजप गंभीर नसेल आणि त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास आम्हाला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांच्या निवडणुका गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, मात्र भाजप सध्या यात गांभीर्य दाखवत नाहीये असे त्यांना वाटते. यावर बोलताना खोतकरांनी असेही स्पष्ट केले की, जर भाजप सोबत येत नसेल, तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून अन्य पक्षांसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेबाबत विचारले असता, ‘आम्हाला कोणी वर्ज्य नाही’ असे उत्तर त्यांनी दिले. जर युती झाली नाही, तर आम्हाला आमचा मार्ग शोधावा लागेल, असे सांगत सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहराच्या विकासासाठी एकत्र येण्यासाठी सर्व पर्याय खुले राहतील असेही खोतकरांनी नमूद केले.

Published on: Dec 24, 2025 12:54 PM