Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानचा ना’पाक’ चेहरा जगासमोर पाडणार उघडा, प्लान नेमका काय?
दहशतवादाविरुद्ध भारताचा निर्धार दर्शविण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ २२ मे पासून जागतिक दौऱ्याला सुरुवात करणार आहे. ५ जूनपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे ५१ खासदार, माजी मंत्री आणि ८ माजी राजदूत सहभागी असणार आहेत. यातील पहिले शिष्टमंडळ ४ मुस्लिम देशांना भेट देणार आहे, ज्यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे.
पाकिस्तानच्या कट्टरता वादाला सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय मंचावर देखील असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानचा नापाक चेहरा अवघ्या जगासमोर उघडा पाडणार आहे. यासाठी असदुद्दीन ओवैसीसोबत काही माणसं आहेत. असदुद्दीन ओवैसीच्या ग्रृपचं नेतृत्व भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे आहे. ओवैसीच्या या ग्रृपमध्ये निशिकांत दुबे, रेखा शर्मा, गुलाम नबी आजाद, सतनाम सिंह संधू यांच्या सहभाग आहे. ओवैसीचा हा ग्रृप ब्रिटन, फान्स, बेल्जिअम, जर्मनी, इटली आणि डेन्मार्क या देशांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तानातून कसा दहशतवाद पोसला जातो याची माहिती साऱ्या जगासमोर हे सारे खासदार मांडणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरमधून झालेल्या जखमांमुळे घाबरलेल्या पाकिस्तान संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या कहाण्या सांगत आहे. मात्र आता भारत संपूर्ण जगाला यामागील खरी कहाणी आणि दहशतवादाविरुद्ध भारताला पोहोचलेली प्रत्येक ठेच याचं सत्य सांगणार आहे. यासाठी भारतीय खासदारांचे ७ शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहेत.
