India-Pakistan : भारताकडून धोका… संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानचा रडका डाव, UN चा पाक सदस्य असीम अहमदचा पोकळ दावा

India-Pakistan : भारताकडून धोका… संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानचा रडका डाव, UN चा पाक सदस्य असीम अहमदचा पोकळ दावा

| Updated on: May 03, 2025 | 2:44 PM

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या सदस्याने एक मोठा दावा केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताकडून पाकिस्तानला धोका असल्याचे म्हणत भारत तात्काळ हल्ला करू शकतो, त्यामुळे आता जगाने या विषयात मध्ये पडावं असं पाकिस्तानने म्हटलंय.

भारताकडून पाकिस्तानला धोका देण्यात आल्याचं म्हणत पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये रडका डाव समोर आला आहे. तर भारत तात्काळ हल्ला करू शकतो, त्यामुळे आता जगाने हस्तक्षेप करावा, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र अर्थात UN मधील पाकिस्तानचा सदस्य असीम अहमद याने हा रडका दावा केला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढला आहे. भारताच्या कठोर भूमिकेमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी एक मोठं वक्तव्य केल्याचेही पाहायला मिळाले. जर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव आणखी वाढला तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक बोलावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी ही माहिती दिली.

Published on: May 03, 2025 02:44 PM