Special Report | MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळेना, सरकार कधी जागं होणार

| Updated on: Jul 04, 2021 | 8:56 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Follow us on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली. दरम्यान, त्याच्या सुसाईड नोटमधून अनेक खुलासे झाले आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांसह परीक्षांच्या तारखांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Aspirants not getting job even after passing MPSC, when government will wake up)