Assam Flood : आसाममध्ये पुराचा हाहाकार! 28 जणांनी गमावला जीव, लाखो नागरिकांनी घर सोडलं

Assam Flood : आसाममध्ये पुराचा हाहाकार! 28 जणांनी गमावला जीव, लाखो नागरिकांनी घर सोडलं

| Updated on: Jun 01, 2025 | 12:15 PM

Heavy Rainfall In Assam : आसाममध्ये सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं असून पुरस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे.

आसाममध्ये पावसाचं थैमान बघायला मिळतं आहे. पुर आणि भुस्खलनामध्ये तब्बल 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 28 जिल्ह्यांमधील 23 लाख नागरिकांना या पुराचा फटका बसलेला आहे. सततच्या पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर आलेल्या आहेत. यात कछारमधील 1 लाख 77 हजार आणि बारपेटामधील 1 लाख 34 हजार नागरिकांनी घरं सोडली आहे.

आसाममध्ये सध्या पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या पुरात आणि त्यामुळे झालेल्या भूस्खलनात 28 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. सगळीकडे पुरस्थिती निर्माण झालेली आहे.

दरम्यान, हिम स्खलन झाल्याने श्रीनगर आणि लेह महामार्गाला फटका बसलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे श्रीनगर आणि लेह महामार्ग बंद झालेला आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकरच्या नुकसानाची माहिती मिळालेली नाही.

Published on: Jun 01, 2025 12:15 PM