“मीच मुख्यमंत्र्यांना म्हटलं संदीपान भुमरेंना पालकमंत्री करा”, अब्दुल सत्तार यांनी ‘तो’ किस्सा सांगितला…

| Updated on: Sep 30, 2022 | 4:15 PM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांना पालकमंत्रीपद कसं मिळालं? यावर भाष्य केलंय.

Follow us on

दत्ता कानवटे, TV9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांना पालकमंत्रीपद कसं मिळालं? यावर भाष्य केलंय. मागच्यावेळी आमच्यातील भांडणामुळे बाहेरच्या व्यक्तीला औरंगाबादचं पालकमंत्री केलं होतं. पण यावेळेला मात्र मी ठाम होतो. आमच्या जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री देऊ नका. संदीपान भुमरे (Sandeepan Bhumre) यांनाच पालकमंत्री करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) केली. त्यांनीही ती मान्य केली. त्यामुळे भुमरे पालकमंत्री झाले. याचा मला आनंद आहे, असं सत्तार म्हणाले.