Aurangabad Rain | औरंगाबादेत मुसळधार पाऊस, शिवना नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 8:42 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हतनूर बंधारा फुटला आहे. हतनूर गावातील कोल्हापूरी बंधारा फुटला आहे. शिवना नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हतनूर परिसरात तुफान पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, शिवना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे दुकान आणि हॉटेलमध्ये पाणी घुसले आहे. तसेच, रस्ते आणि सोसायट्यांमध्येही पाणी घुसले. फुलंब्री शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून औरंगाबाद जळगाव महामार्गावर गुडगा भर पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात हे पाणी शिरले होते , खुलताबाद फुलंब्री महामार्गावर पाणीच पाणी झाले असून दुकानात पाणी शिरले आहे.