Aurangabad Kabra College : एकाच बाकावर 3 जणांना बसवलं, औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधील प्रकार

Aurangabad Kabra College : एकाच बाकावर 3 जणांना बसवलं, औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधील प्रकार

| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 1:35 PM

बीएस्सी, बायोटेक, बीएसी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचं दिसून आलंय.

औरंगाबाद:  औरंगाबादच्या (Aurangabad) एका कॉलजमधून शिक्षण व्यवस्थेचा मोठा ढिसाळ कारभार समोर आलाय. औरंगाबाद शहरातील काबरा कॉलेजमध्ये (College) परीक्षेत गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. या कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्यानं गोधळ उडाल्याचं सांगण्यात येतंय. परीक्षेच्या वेळी एकाच बाकावर चक्क तीन तीन विद्यार्थी (Students) बसवल्याचं समोर आलंय. पण, क्षमता नसताना परीक्षा घेतली कशी, विद्यार्थ्यांना एकाच बाकावर बसवलं कसं, असे अनेक प्रश्न निर्माण होतायेत. बीएस्सी, बायोटेक, बीएसी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचं दिसून आलंय. कॉलेजच्या स्टोअर रूममध्ये बाकडं टाकून तिथे विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली होती. पारदर्शकपणे पार पाडण्यात येणाऱ्या परिक्षांवरच (Examination) आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय. दरम्यान या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. मात्र, यावर आता काय कारवाई होणार, हे पहावं लागेल.

Published on: Jun 02, 2022 01:35 PM