Avinash Jadhav : गावात कुत्रं विचारत नाही म्हणून..; अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर

Avinash Jadhav : गावात कुत्रं विचारत नाही म्हणून..; अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर

| Updated on: Jul 19, 2025 | 4:33 PM

राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता भाजप आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झालेली बघयाला मिळत आहे.

राज ठाकरेंना हिंदी शिकवण्याएवढं दुबेंचं हिंदी चांगलं नाही. या लोकांना आम्ही काय बोलतो आहे हेच कळत नाही. आणि काहीही झालं की राज ठाकरेंनी करून दाखवा, मनसेने करून दाखवा म्हणतात, मग सगळंच आम्हाला करायचं असेल तर तुम्ही तिथे कशाला बसले आहे? द्या राजीनामा, आस प्रत्युत्तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या टीकेवर दिलं आहे. आमचं काम आम्ही करतो आहे, तुमचं काम तुम्ही करा, जेव्हा जे बंद करायचं ते आम्ही करूच असंही अविनाश जाधव यांनी म्हंटलं. राज ठाकरे यांच्या मीरा भाईंदर येथील सभेनंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेमध्ये चांगलीच जुंपलेली बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अविनाश जाधव यांनी भाष्य केलं.

यावेळी पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, बिहार, पाटणा, उत्तर प्रदेश इथे बसून ही लोक महाराष्ट्रावर का बोलतात? मागच्या ज्या काही घटना राज्यात घडल्या त्यात कोणत्या उत्तर भारतीय लोकांना आम्ही मारलं? पण या लोकांना सतत चर्चेत राहायच आहे. म्हणून ते सातत्याने राज साहेबांवर बोलत आहे आणि तिकडे आपलं महत्व वाढवून घेत आहे. खरंतर त्यांना तिकडे गावात कोणी कुत्रा देखील विचारत नाही, अशी खोचक टीका जाधव यांनी खासदार दुबे आणि मनोज तिवारी यांच्यावर केली आहे.

Published on: Jul 19, 2025 04:33 PM