शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी 24 जुलै रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी 24 जुलै रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. जोपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारकडून असमाधानकारक आणि टाळाटाळीची उत्तरे मिळत असल्याने महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत ठोस तारीख आणि निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनामुळे राज्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Jul 19, 2025 05:52 PM
