बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापुरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी भाजपत प्रवेश केला. शिंदे सेनेतील घराणेशाही मोडून काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. राऊत यांच्यासोबतच नगरसेविका दिपाली लामतुरे यांच्यासह अनेकांनीही भाजपची वाट धरली आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात बदल अपेक्षित आहेत.
बदलापुरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. शिंदेच्या शिवसेनेत घराणेशाही वाढल्याचा आरोप करत ती मोडून काढण्यासाठी हा पक्षप्रवेश केल्याचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी आणि वहिनी सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्षप्रवेशामुळे बदलापूरमधील राजकीय समीकरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. प्रवीण राऊत यांच्यासोबतच शिंदे सेनेच्या नगरसेविका दिपाली लामतुरे आणि त्यांचे पतीही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.