Shivsena : विजय शिवतारेंच्या शिवसेनेतून जाण्यानं काहीही फरक पडणार नाही, ते निष्ठावंत शिवसैनिक कधी नव्हतेच; चांदेरेंची टीका

| Updated on: Jul 16, 2022 | 9:14 PM

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवतारेंना जागा त्यांची दाखवू, असे चांदेरे म्हणाले. तसेच विजय शिवतारे सच्चे शिवसैनिक कधी नव्हतेच. त्यांच्या शिवसेनेतून जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचे चांदेरे म्हणाले.

Follow us on

विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) जाण्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही. पुढच्या वेळेस विजय शिवतारे आमदार होणार नाहीत, असे शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे (Balasaheb Chandere) म्हणाले आहेत. शिवतारेंवर त्यांनी टीका केली आहे. त्यांनी फक्त एक पंचायत समिती, जिल्हा परिषद पुढच्या वेळेस निवडून आणावी, मी आव्हान देतो, असे बाळासाहेब चांदेरे म्हणाले. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. 2021मध्ये त्यांनी नवीन पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज पाठवला होता. तेव्हाच त्यांनी पक्षाशी गद्दारी केली होती.  यासंबंधीचा पुरावाही बाळासाहेब चांदेरेंनी दाखवला. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवतारेंना जागा त्यांची दाखवू, असे चांदेरे म्हणाले. तसेच विजय शिवतारे सच्चे शिवसैनिक (Shivsainik) कधी नव्हतेच. त्यांच्या शिवसेनेतून जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचे चांदेरे म्हणाले.